मुख्य मजकुरावर जा
यशायाह ८:१६-२२

व्यवस्था, साक्ष आणि अंधकार

यशायाह ८:१६-२२
१६
चेतावणीच्या या साक्षीला बांधून घ्या आणि परमेश्वराची ही शिकवण माझ्या शिष्यांमध्ये मोहोरबंद करा.
१७
मी याहवेहची वाट पाहीन जे त्यांचे मुख याकोबाच्या वंशजांपासून लपवित आहेत. मी त्यांच्यावर माझा भरवसा ठेवेन.
१८
मी आणि याहवेहने मला दिलेली लेकरेही येथे आहेत. आम्ही, सीयोन पर्वतावर राहणारे सर्वसमर्थ याहवेहकडून इस्राएलला मिळालेले चिन्ह व प्रतीक आहोत.
१९
जेव्हा कोणी तुम्हाला प्रेतात्म्यांकडून अर्थ सांगणाऱ्यांचा सल्ला आणि भूतविद्येचा सल्ला घेण्यास सांगतात, जे कुजबुजतात आणि पुटपुटतात, त्यांच्याकडे लोकांनी त्यांच्या परमेश्वराबद्दल विचारणा करावी काय? जिवंत लोकांसाठी मृतांचा सल्ला का घ्यावा?
२०
परमेश्वराच्या सूचनेचा आणि चेतावणीच्या साक्षीचा सल्ला घ्या. जर कोणी या शब्दाप्रमाणे बोलत नसेल तर त्यांच्याकडे पहाटेचा प्रकाश नाही.
२१
दुःखी आणि भुकेले असे ते देशभर फिरत राहतील; जेव्हा ते भुकेने व्याकूळ होतील, तेव्हा ते रागावतील आणि वर पाहतील आणि त्यांच्या राजाला आणि त्यांच्या परमेश्वराला शाप देतील.
२२
तेव्हा ते खाली पृथ्वीकडे पाहतील आणि त्यांना फक्त संकट, अंधकार आणि भयभीत करणारी निस्तेज काळोखी दिसेल आणि त्यांना गडद अंधारात ढकलण्यात येईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options