यशायाह ६६:७-१४
७
“प्रसववेदना सुरू होण्यापूर्वीच तिची प्रसूती होईल; वेणा येण्यापूर्वीच ती पुत्र प्रसवेल.
८
असे झालेले कोणी कधी ऐकले आहे का? असे कोणी कधी पाहिले आहे का? एका दिवसात एखादे राष्ट्र जन्मास येते किंवा एका क्षणात एखादे राष्ट्र उत्पन्न होते? तरी देखील सीयोनाच्या प्रसववेदना सुरू होण्यापूर्वीच ती तिच्या संततीस जन्म देते.
९
जन्म देण्याच्या क्षणापर्यंत आणल्यावर, मी प्रसूत करणार नाही काय?” असे याहवेह म्हणतात. “प्रसूतीस आणल्यावर मी गर्भाशय बंद करतो काय?” असे परमेश्वर म्हणतात.
१०
“यरुशलेमवर प्रीती करणार्यांनो, तिच्याबरोबर हर्ष करा व तिच्यासाठी आनंद साजरा करा; तिच्यासाठी शोक करणार्या सर्व लोकांनो, तिच्याबरोबर मोठा उल्हास करा.
११
कारण तिच्या सांत्वन करणाऱ्या स्तनाने तुमचे संगोपन होऊन तुम्ही तृप्त व्हाल; तान्हेबाळ मनमुरादपणे मातेचे स्तनपान करते, तसे तुम्हीही तिच्या ओसंडून वाहणाऱ्या विपुलतेत आनंद कराल.”
१२
कारण याहवेह असे म्हणतात: “मी तिच्या शांततेस नदीप्रमाणे वाढवेन, आणि राष्ट्रांची समृद्धी ओसंडून वाहणाऱ्या झऱ्यांसारखी करेन; तुमचे संगोपन होईल व तुम्ही तिच्या कडेवर बसून फिराल, आणि तिच्या मांडीवर जोजवले जाल.
१३
जसे आई तान्ह्या बाळाचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करेन; आणि तुम्ही यरुशलेमाप्रीत्यर्थ सांत्वन पावाल.”
१४
हे तुमच्या नजरेस पडताच, तुम्हाला आनंदाचे भरते येईल व तुम्ही गवतासारखे बहरून जाल; याहवेहचा कल्याणकारी हात त्यांच्या सेवकांस प्रकट होईल, पण त्यांच्या शत्रूंना त्यांचा क्रोध दाखविण्यात येईल.
Settings