Skip to content
यशायाह ६०:३-७

यशायाह ६०:३-७

राष्ट्रे तुझ्या प्रकाशात येतील, आणि राजे तुझ्या उदयाच्या तेजामध्ये येतील.
“आपली दृष्टी वर कर आणि सभोवती पाहा: सर्व सभा एकत्र येऊन तुझ्याकडे येत आहे; तुझे पुत्र दूरवरून येत आहेत, तुझ्या कन्या कमरेवर उचलून आणण्यात येत आहेत.
मग तू ते बघशील व उल्हासित होशील, तुझे अंतःकरण स्पंदेल व आनंदाने फुगून जाईल; सागराची संपत्ती तुझ्याकडे आणण्यात येईल, अनेक देशांची समृद्धी तुझ्याकडे येईल.
उंटांचे काफिले तुझी भूमी व्यापतील, तरुण उंट मिद्यान व एफाह येथून येतील. आणि सर्व शबातून सोने व ऊद घेऊन तुझ्याकडे येतील. आणि याहवेहच्या स्तुतीची घोषणा केली जाईल.
केदारचे सर्व कळप तुला दिले जातील व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील; ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील, आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options