मुख्य मजकुरावर जा
यशायाह ४९:८-१३

तारणाचा व पुनर्स्थापनेचा दिवस

यशायाह ४९:८-१३
याहवेह असे म्हणतात: “माझ्या कृपेच्या समयी मी तुम्हाला उत्तर देईन, आणि तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य करेन; मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला सर्व लोकांसाठी एक करार असे करेन, जेणेकरून, तुमची भूमी पुनर्स्थापित होईल, आणि ओसाड वतने पुन्हा तुमच्या स्वाधीन होतील,
बंदिवानांना ‘बाहेर निघा,’ असे म्हणावे आणि जे अंधारात आहेत, त्यांना म्हणावे, ‘स्वतंत्र व्हा!’ “ते रस्त्याच्या काठावर चरतील आणि प्रत्येक नापीक टेकड्यांवर त्यांना गवत सापडेल.
१०
ते तहानलेले किंवा भुकेले होणार नाहीत. वाळवंटातील किंवा सूर्याची उष्णता त्यांना इजा करणार नाही. ज्यांनी त्यांच्यावर करुणा केली आहे, ते त्याचे मार्गदर्शन करतील आणि त्यांना पाण्याच्या झर्‍यांजवळून चालवितील.
११
मी माझ्या सर्व पर्वतांच्या सरळ वाटा करेन, आणि माझे महामार्ग उंचावले जातील.
१२
पाहा, ते दूरच्या ठिकाणांहून येतील— काही उत्तरेकडून, काही पश्चिमेकडून, तर काही सीनीम प्रांतातून येतील.”
१३
हे आकाशांनो, हर्षगर्जना करा; अगे पृथ्वी, आनंदित हो; अहो पर्वतांनो, गीते वर उचंबळून येऊ द्या! कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे व त्यांच्या पीडितांवर करुणा ते करतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options