Skip to content
यशायाह ४४:९-१७

यशायाह ४४:९-१७

कोरीव मूर्ती घडविणारे किती शून्यवत आहेत, आणि त्यांना जे मौल्यवान वाटते ते मातीमोल आहे. जे त्यांच्यावतीने बोलतात, ते अंध आहेत; ते अज्ञानी असून ते लज्जित झाले आहेत.
१०
जिच्यापासून काहीही लाभ होत नाही अशा दैवतांना आकार कोण देतो व त्या मूर्ती कोण घडवितो?
११
हे करणारे लोक लज्जित होतील; हे सर्व कारागीर तर केवळ मानव आहेत. या सर्वांनी एकत्र यावे व सिद्ध करावे; त्यांना भयभीत करून लज्जित करण्यात येईल.
१२
लोहार अवजारे घेतो आणि आपल्या भट्टीपाशी उभा राहून तो काम करतो; मूर्तीला आकार देण्यासाठी तो हातोडी वापरतो, त्याच्या बाहूच्या शक्तीने तो त्याला ठोकून घडवितो. मग त्याला भूक लागते व तो शक्तिहीन होतो; तो पाणी पीत नाही आणि दुर्बल होतो.
१३
सुतार लाकडाचा एक ओंडका घेऊन त्याचे मोजपट्टीने माप घेतो आणि त्यावर लेखणीने खुणा करतो; पटाशीने ते तासून गुळगुळीत करतो. कंपासने त्यावर निशाणी करतो. त्याला मानवाच्या शरीराचा आकार देतो, सर्व मानवी गौरवाने अलंकृत करतो, जेणेकरून त्याची मंदिरात स्थापना होऊ शकेल.
१४
तो गंधसरू तोडतो किंवा बहुतेक सुरू वा एला ही झाडे निवडतो, तो त्या झाडाला रानातील इतर झाडांसह वाढवितो, किंवा देवदारू लावतो व पावसाच्या पाण्यावर त्याला वाढू देतो.
१५
मनुष्य त्याचा उपयोग जळणासाठी करतो; काही लाकूड जाळून स्वतःला ऊब मिळण्यासाठी, आणि आग पेटवून भाकर भाजण्यासाठी. परंतु तो त्या लाकडातून स्वतःसाठी एक देवही निर्माण करतो व त्याची आराधना करतो; तो एक मूर्ती तयार करतो व त्यास नमन करतो.
१६
अर्धे लाकूड तो जळण म्हणून वापरतो; त्यावर आपले अन्न शिजवितो, तो त्यावर मांस भाजतो व खाऊन तृप्त होतो. आपल्याला ऊबही आणतो व म्हणतो, “अहा! मी किती उबदार झालो आहे; मला अग्नी दिसत आहे.”
१७
आणि उरलेल्या लाकडापासून तो आपले दैवत म्हणजे मूर्ती तयार करतो; त्या मूर्तीस नमन करून तिची पूजा करतो, तो त्याची प्रार्थना करतो आणि म्हणतो “माझी सुटका कर! तू माझ्या देव आहेस!”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options