मुख्य मजकुरावर जा
यशायाह २८:१-६

दारुड्या एफ्राइमला धिक्कार

यशायाह २८:१-६
त्या मुकुटाला धिक्कार असो, जो एफ्राईमच्या दारुड्यांचा अभिमान आहे, त्या फिके पडणार्‍या फुलाला, त्याच्या तेजस्वी सौंदर्याला, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेल्या— त्या नगराला, जो मद्याने क्षीण झालेल्यांचा अभिमान आहे!
पाहा, प्रभूकडे असा एकजण आहे जो सामर्थ्यवान आणि बलवान आहे. तो गारपीट आणि विध्वंस करणाऱ्या वावटळीसारखा, वेगाने फटकारणारा पाऊस आणि पूरासारखा मुसळधार पाऊस, तो पूर्णशक्तीने त्याला जमिनीवर फेकून देईल.
तो मुकुट, एफ्राईमच्या मद्यपींचा अभिमान, पायाखाली तुडविला जाईल.
ते सुकत जाणारे फूल, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेले, त्याचे तेजस्वी सौंदर्य, कापणीच्या आधी पिकलेल्या अंजिरांसारखे होईल— लोक त्यांना पाहताक्षणीच त्यांना हातात घेतात, व त्यांना गिळंकृत करतात.
त्या दिवशी सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी एक गौरवशाली मुकुट, सुंदर पुष्पचक्र असे होतील.
जे न्याय करण्यासाठी बसतात त्यांच्यासाठी ते न्यायाचा आत्मा होतील, जे वेशीतूनच युद्धामधून मागे फिरतात त्यांच्यासाठी ते सामर्थ्याचा उगम असतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options