Skip to content
यशायाह २२:६-१४

यशायाह २२:६-१४

एलाम मनुष्यांचे रथ, त्यांचा सारथी आणि घोडे व भाले यासहित बाण ठेवण्याचा भाता हाती घेते; कीर ढाल उघडी करते.
तुमची आवडती खोरी रथांनी भरून गेली आहेत, आणि घोडेस्वार नगराच्या फाटकांवर तैनात आहेत.
प्रभूने यहूदीयाचे संरक्षण काढून टाकले, आणि तुम्ही त्या दिवशी जंगलाच्या राजवाड्यामध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांकडे पाहिले.
तुम्ही पाहिले की, दावीद नगराची तटबंदी पुष्कळ ठिकाणी तुटलेली होती; खालच्या जलाशयात तुम्ही पाणी साठविले होते.
१०
यरुशलेममधील इमारती तुम्ही मोजल्या आणि भिंती भक्कम करण्यासाठी घरे जमीनदोस्त करून टाकली.
११
जुन्या जलाशयाच्या पाण्यासाठी तुम्ही दोन भिंतींमध्ये हौद बांधला, परंतु ज्यांनी तो तयार केला, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही, किंवा ज्यांनी ते फार पूर्वीपासून योजले होते, त्यांना आदर दिला नाही.
१२
प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, रडण्यासाठी आणि आक्रोश करण्यासाठी, तुमचे केस मुंडविण्यासाठी आणि गोणपाट घालण्यासाठी, त्या दिवशी तुम्हाला बोलावतील.
१३
परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे, गुरांची कत्तल आणि मेंढरांची हत्या, मांस खाणे आणि द्राक्षारस पिणे! तुम्ही म्हणता, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत!”
१४
सर्वसमर्थ याहवेहनी माझ्या ऐकण्यात हे प्रकट केले आहे: “तुझ्या मरणाच्या दिवसापर्यंत या पापाचे प्रायश्चित्त केले जाणार नाही,” असे प्रभू सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options