Skip to content
यशायाह १०:५-१३

यशायाह १०:५-१३

५
“अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे!
६
मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो, मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो, त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी, आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी.
७
परंतु हा त्याचा उद्देश नाही, त्याच्या मनात हे नाही; त्याचा उद्देश आहे की नाश करावा, अनेक राष्ट्रांचा नाश करून त्यांचा अंत करावा.
८
‘माझे सेनापती सर्व राजे नाहीत काय?’ असे ते म्हणतात.
९
‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय? हमाथ अर्पादसारखा आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय?
१०
जशी माझ्या हाताने मूर्तींपूजक राज्ये ताब्यात घेतली, अशी राज्ये ज्यांच्या प्रतिमा यरुशलेम आणि शोमरोनपेक्षा श्रेष्ठ होत्या—
११
शोमरोन आणि तिच्या मूर्तींबरोबर मी जसा व्यवहार केला तसा व्यवहार मी यरुशलेम आणि तिच्या मूर्तींबरोबर करू नये काय?’ ”
१२
जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन.
१३
कारण ते म्हणतात: “ ‘माझ्या हाताच्या शक्तीने मी हे केले आहे, आणि माझ्या शहाणपणाने हे केले आहे, कारण माझ्याकडे समंजसपणा आहे. मी राष्ट्रांच्या सीमा काढून टाकल्या, मी त्यांचे खजिने लुटले; एका बलवानाप्रमाणे मी त्यांच्या राजांना वश केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options