Skip to content
यशायाह १०:१-४

अन्यायी राज्यकर्त्यांना धिक्कार

यशायाह १०:१-४
त्यांचा धिक्कार असो, जे अन्यायी कायदे बनवितात— जुलूम करणारा हुकूमनामा जे काढतात,
गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आणि माझ्या लोकांपैकी पीडितांना न्यायापासून वंचित करण्यासाठी, विधवांना त्यांचे सावज बनविण्यासाठी आणि अनाथांना लुटण्यासाठी.
दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल, जेव्हा फार दुरून संकट येईल? तुम्ही कोणाकडे मदतीसाठी धावणार आहात? तुम्ही तुमची संपत्ती कुठे सोडून देणार?
बंदिवानांमध्‍ये लपून बसणे, किंवा मेलेल्यांमध्ये पडून राहाणे या वाचून काहीही उरणार नाही. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options