Skip to content
होशेय ९:१०-१७

होशेय ९:१०-१७

१०
“जेव्हा मला इस्राएल आढळला, तेव्हा ते रानात द्राक्षे आढळल्यासारखे होते; जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना पाहिले, ते अंजिराच्या झाडावर प्रथमफळ पाहण्यासारखे होते. पण जेव्हा ते बआल-पौराला आले तेव्हा त्यांनी त्या घृणास्पद मूर्तींपुढे स्वतःला समर्पित केले आणि त्यांच्या आवडत्या वस्तूप्रमाणे अमंगळ झाले.
११
एफ्राईमचे वैभव पक्ष्याप्रमाणे उडून जाईल— जन्म नाही, गर्भधारणा नाही, गर्भसंभव नाही.
१२
जरी त्यांनी मुलांचे संगोपन केले, तरी मी त्यांना सर्वांपासून दूर करेन. मी त्या लोकांपासून निघून जाईन, तेव्हा त्यांचा धिक्कार असो.
१३
सोर जसा सुखदायी ठिकाणी लावलेला मी पाहिला, तसाच एफ्राईम आहे, परंतु एफ्राईम आपल्या मुलांना वध करणार्‍याकडे घेऊन येईल.”
१४
हे याहवेह, त्यांना द्या— तुम्ही त्यांना काय द्याल? त्यांना वांझ गर्भाशये आणि शुष्क स्तने द्या.
१५
“गिलगालात त्यांची सर्व दुष्कृत्ये आहेत, मी त्यांचा तिथेच द्वेष केला. त्यांच्या पापी कृत्यांमुळे, मी त्यांना माझ्या घरातून हाकलून देईन. मी यापुढे त्यांच्यावर प्रीती करणार नाही; त्यांचे सर्व पुढारी बंडखोर आहेत.
१६
एफ्राईम नाश पावला आहे. त्यांची मुळे सुकून गेली आहेत. ते फळ देत नाही. जरी ते मुलांना जन्म देतील, तर मी त्यांचे प्रिय मूल मारून टाकेन.”
१७
माझा परमेश्वर त्यांना नाकारील कारण त्यांनी त्यांची आज्ञा पाळली नाही; ते देशादेशातून भटकत राहतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options