Skip to content
होशेय ७:३-७

होशेय ७:३-७

“ते राजाला आपल्या दुष्टाईने, अधिपतीला आपल्या लबाड्यांनी हर्षित करतात.
ते सर्वच व्यभिचारी आहेत; रोटी भाजणार्‍याच्या सतत पेटलेल्या भट्टीप्रमाणे ते आहेत. पीठ मळून ते फुगेपर्यंत तो विस्तव चाळविण्याचे थांबवितो.
आमच्या राजाच्या उत्सवाच्या दिवशी अधिपती द्राक्षारसाने धुंद होतात, आणि त्याने आपला हात कुचेष्टा करणार्‍यांबरोबर मिळविला आहे.
कारस्थाने करताना त्यांची हृदये तापलेल्या भट्टीसारखी होतात. त्यांची उत्कटता रात्रभर धुमसत असते; सकाळी तो प्रज्वलित अग्नीसारखा पेट घेतो.
ते सर्व भट्टीसारखे तप्त आहेत; ते त्यांच्या अधिपतींना गिळून टाकतात. त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत, त्यातील कोणी मला हाक मारीत नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options