Skip to content
होशेय ४:१-६

होशेय ४:१-६

इस्राएली लोकहो, याहवेहचे वचन ऐका. या देशात राहणार्‍यांवर याहवेहचा आरोप आहे: या देशात विश्वासूपणा नाही, प्रीती नाही, परमेश्वराप्रती ज्ञान नाही.
या ठिकाणी फक्त शाप, खोटे बोलणे आणि खून, चोरी आणि व्यभिचार आहे; सर्व सीमाबंदी ते मोडून टाकतात, आणि रक्तपातानंतर रक्तपात होतो.
म्हणूनच तुमची भूमी कोरडी पडत आहे, येथे राहणारे सर्व नाश पावत आहे; रान पशू, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासे नाहीसे होत आहेत.
परंतु कोणीही आरोप करू नका, तुम्ही इतरांवर आळ घेऊ नका, कारण तुमचे लोक असे आहेत जे याजकांवर दोष लावतात.
तुम्ही दिवस व रात्र अडखळता, आणि संदेष्टेही तुमच्याबरोबर अडखळतात. म्हणून मी तुमच्या आईचा नाश करेन—
ज्ञान नसल्यामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे, “कारण, तुम्ही ज्ञानाला नाकारले आहे, म्हणून मी तुम्हाला माझे याजक म्हणून नाकारत आहे; कारण तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे, म्हणून मी सुद्धा तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष करेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options