मुख्य मजकुरावर जा
होशेय १३:१-३

एफ्राईमाचा धर्मत्याग आणि ऱ्हास

होशेय १३:१-३
जेव्हा एफ्राईम बोलत असे, तेव्हा लोक थरथर कापत असत; कारण तो इस्राएलाचा अधिपती होता. पण तो बआल मूर्तीच्या उपासनेचा दोषी झाला आणि मरण पावला.
आता ते अधिकाधिक पाप करीत आहेत; ते आपल्या चांदीपासून स्वतःसाठी मूर्ती बनवतात, हुशारीने तयार केलेल्या प्रतिमा, त्या सर्व कारागिरांची हस्तकृती आहेत. या लोकांबद्दल असे म्हटले जाते, “हे नरबली देतात! ते वासराच्या मूर्तीचे चुंबन घेतात!”
म्हणून ते सकाळच्या धुक्यासारखे, पहाटेच्या लवकर उडून जाणार्‍या दहिवरासारखे, खळ्यातून उडून जाणार्‍या भुशासारखे, धुराड्यातून निघणार्‍या धुराप्रमाणे होतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options