Skip to content
उत्पत्ती ८:१-५

देव पाणी ओसरवतो

उत्पत्ती ८:१-५
१
परमेश्वराने नोआह आणि तारवातील सर्व पाळीव व वन्यप्राण्यांचे स्मरण केले. त्यांनी पृथ्वीवरून वाहण्यासाठी वारा पाठविला आणि पुराचे पाणी ओसरू लागले.
२
पृथ्वीतलातील पाण्याचे झरे उफाळण्याचे थांबले आणि आकाशातील जलप्रलयाची दारे बंद झाली, आकाशातून पडणारा पाऊसही थांबला.
३
पृथ्वीवरून पाणी सतत कमी होत गेले. दीडशे दिवस उलटल्यानंतर पाणी ओसरले.
४
आणि सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर स्थिरावले.
५
पाणी ओसरू लागले व दहाव्या महिन्यापर्यंत पाणी सतत ओसरत होते आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांची शिखरे दिसू लागली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options