Skip to content
उत्पत्ती २७:१-१७

उत्पत्ती २७:१-१७

इसहाक वृद्ध झाला, त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा एके दिवशी त्याने आपला ज्येष्ठपुत्र एसाव याला हाक मारली व म्हटले, “माझ्या मुला.” “बाबा, काय आज्ञा,” तो उत्तरला.
तेव्हा इसहाक त्याला म्हणाला, “मी आता वृद्ध झालो आहे, आणि माझ्या मृत्यूचा दिवस मला माहीत नाही.
तर तुझे शस्त्र घेऊन ये—धनुष्य व बाण घे—आणि खुल्या मैदानात जाऊन एखाद्या वनपशूची शिकार करून आण.
मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर आणि मला खाण्यासाठी ते इकडे घेऊ ये, म्हणजे मरण्यापूर्वी मी माझा आशीर्वाद तुला देईन.”
इसहाक आपला पुत्र एसावसोबत बोलत आहे हे रिबेकाह ऐकत होती. एसाव रानात शिकार करून मांस आणण्यास गेला,
रिबेकाहने आपला पुत्र याकोब याला बोलाविले आणि ती त्याला म्हणाली “हे बघ, तुझे वडील तुझा भाऊ एसावाला म्हणाले,
एखाद्या वनपशूची शिकार करून आण, मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर, म्हणजे मरण्यापूर्वी याहवेहच्या सानिध्यात जो आशीर्वाद आहे, तो मी तुला देईन, हे सांगताना मी ऐकले.”
ती म्हणाली, “आता माझ्या मुला, नीट लक्ष देऊन ऐक व मी सांगते तसेच कर:
बाहेर कळपात जा आणि दोन चांगली करडे घेऊ ये. मी त्या करडांचे तुझ्या वडिलांच्या आवडीप्रमाणे रुचकर भोजन तयार करेन,
१०
मग ते तू आपल्या वडिलांकडे घेऊन जा. म्हणजे मृत्यूपूर्वी ते तुला आशीर्वाद देतील.”
११
याकोब त्याची आई रिबेकाहला म्हणाला, “पण माझा भाऊ एसाव तर केसाळ आहे आणि माझी कातडी अगदी केसरहित आहे.
१२
वडिलांनी मला चाचपून पाहिले तर? त्यांना वाटेल मी त्यांना फसवीत आहे आणि मग आशीर्वादाऐवजी मी स्वतःवर शाप ओढवून घेईन.”
१३
तेव्हा रिबेकाह म्हणाली, “माझ्या बाळा, ते शाप माझ्यावर पडोत. मी सांगते त्याप्रमाणे तू कर, बाहेर जा आणि करडे घेऊन ये.”
१४
तेव्हा याकोबाने करडे कापून, स्वच्छ करून आपल्या आईकडे आणली, आणि तिने त्याच्या वडिलांना आवडणारे रुचकर भोजन तयार केले.
१५
मग रिबेकाहने घरात असलेले एसावाचे उत्तम कपडे घेतले आणि आपला धाकटा मुलगा याकोबाला ते घालण्यास सांगितले.
१६
तिने त्याचा हात आणि मानेवरचा गुळगुळीत भाग करडांच्या कातड्याने झाकला.
१७
नंतर तिने रुचकर भोजन व भाकर आपला मुलगा याकोबाजवळ दिली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options