Skip to content
उत्पत्ती २३:८-१६

उत्पत्ती २३:८-१६

“मी आपल्या मयतास पुरावे अशी तुमची इच्छा असेल तर माझे ऐका, जोहराचा पुत्र एफ्रोन,
याला त्याच्या शेताच्या टोकाला असलेली मकपेला नावाची गुहा मला विकत देण्यास माझ्यावतीने विनंती करा. तिची पूर्ण किंमत मी देईन आणि ती माझ्या कुटुंबीयांसाठी स्मशानभूमी होईल.”
१०
एफ्रोन हेथी हा हेथी लोकांसह बसलेला होता, त्या नगरचौकात असलेल्या सर्व हेथी लोकांसमक्ष तो अब्राहामाला म्हणाला,
११
“नाही, महाराज, माझे ऐका; ती गुहा आणि ते शेत मी तुम्हाला देईन, माझ्या लोकांच्या देखत मी तुम्हाला ती देत आहे. तिथे तुम्ही तुमच्या मृतास मूठमाती द्या.”
१२
अब्राहामाने त्या देशातील लोकांना पुन्हा लवून मुजरा केला
१३
आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, “माझे ऐका, मला ती जागा तुझ्याकडून विकत घेऊ दे; त्या शेताची सर्व किंमत मी तुला देईन. मग मी माझ्या मृताला तिथे मूठमाती देईन.”
१४
हे ऐकून एफ्रोन अब्राहामाला म्हणाला,
१५
“महाराज, त्या जागेची किंमत केवळ चांदीची चारशे शेकेल आहे; पण तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याचे काय? तिथे आपल्या मृताला मूठमाती द्या.”
१६
तेव्हा अब्राहामाने कबूल केल्याप्रमाणे एफ्रोनाने हेथी लोकांच्या समक्ष सांगितलेली किंमत, म्हणजे चारशे शेकेल चांदी, त्या काळातील व्यापार्‍यांच्या परिमाणानुसार अब्राहामाने त्याला दिली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options