अब्राहाम दफनभूमी मागतो
उत्पत्ती २३:३-६
३
आणि साराहच्या मृतदेहाजवळ उभे राहून अब्राहाम हेथीच्या लोकांना म्हणाला,
४
“या देशात मी एक परकीय व अनोळखी आहे. कृपया मला माझ्या मृतास पुरण्याकरिता जमिनीचा एक भाग विकत द्या.”
५
हेथी लोकांनी अब्राहामाला उत्तर दिले,
६
“महाराज, आमचे ऐका. आमच्यामध्ये आपण एक पराक्रमी राजपुत्र आहात. तुम्ही आपल्या मृतांसाठी स्वतःच कबर निवडून त्यांना मूठमाती द्या. आपली खाजगी कबर तुम्हाला देण्यास आमच्यातील कोणीही नकार देणार नाही.”
Settings