उत्पत्ती २१:२७-३२
२७
मग अब्राहामाने मेंढरे आणि बैल घेतले आणि अबीमेलेखाला दिले आणि त्या दोघांनी करार केला.
२८
पण अब्राहामाने सात मेंढ्या बाजूला काढून ठेवल्या,
२९
तेव्हा अबीमेलेखाने अब्राहामाला विचारले, “तू असे का करीत आहेस? त्या मेंढ्या बाजूला का काढीत आहेस?”
३०
यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.”
३१
म्हणून त्या वेळेपासून त्या विहिरीचे नाव बेअर-शेबा पडले. कारण दोघांनी त्याच ठिकाणी शपथ घेऊन करार केला होता.
३२
बेअर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमेलेख आणि त्याचा सेनापती पीकोल पलिष्ट्यांच्या देशात परतले.
Settings