उत्पत्ती ११:२४-२८
२४
नाहोर 29 वर्षांचा होता तेव्हा त्याला तेरह झाला.
२५
तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
२६
तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले.
२७
तेरहाच्या वंशजाचा तपशील: तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला.
२८
पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला.
Settings