Skip to content
गलातीकरांस १:१-५

अभिवादन आणि प्रेषितीय अधिकार

गलातीकरांस १:१-५
प्रेषित पौल, ज्याला मनुष्यांनी नाही किंवा एका मनुष्याने पाठवले नाही, परंतु येशू ख्रिस्त आणि परमेश्वर पिता ज्यांनी येशूंना मरणातून उठविले त्यांच्याद्वारे पाठवण्यात आलेला, त्या माझ्याकडून
आणि माझ्याबरोबर येथे असलेले सर्व बंधू आणि भगिनी यांच्याकडून,
परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
ज्यांनी आपला परमेश्वर आणि पिता यांच्या इच्छेला अनुसरून आमच्या पापांसाठी स्वतःला दिले यासाठी की सध्याच्या दुष्ट जगापासून आम्हाला वाचवावे.
त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options