Skip to content
यहेज्केल ७:१४-१९

यहेज्केल ७:१४-१९

१४
“ ‘त्यांनी कर्णे वाजविली आहे, त्यांनी सर्वकाही सज्ज केले आहे, परंतु कोणी युद्धात जाणार नाही, कारण संपूर्ण समुहावर माझा क्रोध आहे.
१५
बाहेर तलवार आहे; व आत पीडा व दुष्काळ आहे. जे देशात राहतात ते तलवारीने मरतील; जे शहरात आहेत ते दुष्काळ व पीडांनी नाश पावतील.
१६
आश्रयासाठी पळ काढणारे डोंगराकडे पळतील. खोर्‍यातील पारव्यांप्रमाणे, आपल्या स्वतःच्या पापाकरिता, ते सर्व शोक करतील.
१७
प्रत्येक हात ढिले पडतील; प्रत्येक पाय लघवीने भिजेल.
१८
ते गोणपाट नेसतील आणि भयाचे वस्त्र घालतील. प्रत्येक चेहरा लज्जेने झाकला जाईल, आणि प्रत्येक डोक्याचे मुंडण केले जाईल.
१९
“ ‘ते आपली चांदी रस्त्यावर फेकतील, आणि त्यांचे सोने अशुद्ध मानले जाईल. याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे चांदी व सोने त्यांची सुटका करू शकणार नाही. ते त्यांची भूक मिटवणार नाही किंवा त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांच्या संपत्तीनेच त्यांना पापात पडण्यास भाग पाडले आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options