Skip to content
यहेज्केल ७:५-१३

यहेज्केल ७:५-१३

“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘विपत्ती! कधी ऐकली नाही अशी विपत्ती पाहा, ती येत आहे!
अंत आला आहे! अंत आला आहे! तो स्वतः तुझ्याविरुद्ध उठला आहे. पाहा, तो येत आहे!
तुम्ही जे देशात राहतात, त्या तुमच्यावर विनाश आला आहे. समय आला आहे! दिवस जवळ आहे! डोंगरावर आनंद नाही, तर गोंधळ आहे.
मी आपला क्रोध तुमच्यावर लवकरच ओतीत आहे आणि माझा राग तुमच्याविरुद्ध भडकणार आहे. तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.
मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही; मी तुमची गय करणार नाही. मी तुम्हाला तुमच्या कृत्यांचे आणि तुमच्यातील अमंगळ कार्याचे प्रतिफळ देईन. “ ‘तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेहने तुमच्यावर वार केला आहे.
१०
“ ‘पाहा, तो दिवस! पाहा, तो येत आहे! विनाशाचा भडका उठला आहे, काठीला अंकुर फुटला आहे, अहंकार फुलला आहे!
११
हिंसा उदय पावली आहे, दुष्टाला शिक्षा करण्यास काठी उठली आहे. त्या लोकांतून कोणीही, त्या समुहातील कोणीही सुटणार नाही; त्यांच्या संपत्तीतील, कशाचे काहीही मोल राहणार नाही.
१२
समय आला आहे! दिवस येऊन ठेपला आहे! विकत घेणार्‍याने आनंद करू नये किंवा विकत देणार्‍याने दुःखी होऊ नये, कारण माझा क्रोध संपूर्ण समुहावर आहे.
१३
जोपर्यंत विकत घेणारा व देणारा जिवंत आहे तोपर्यंत जी संपत्ती विकण्यात आली होती; त्याची फेड होणार नाही. कारण संपूर्ण समुहाविषयी असलेला दृष्टान्त पलटणार नाही. त्यांच्या पापामुळे त्यांच्यातील एकही व्यक्ती आपला जीव वाचविणार नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options