Skip to content
यहेज्केल ३८:९-१६

यहेज्केल ३८:९-१६

९
तू आणि तुझे सर्व सैन्य व तुझ्याबरोबर अनेक राष्ट्रे वादळाप्रमाणे पुढे जातील; तुम्ही मेघांप्रमाणे देश झाकून टाकाल.
१०
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तुमच्या मनात विचार येतील आणि तुम्ही वाईट युक्ती योजाल.
११
तू म्हणशील, “तट नसलेल्या गावांवर मी आक्रमण करेन; शांतीच्या व निश्चिंत असलेल्या लोकांवर मी हल्ला करेन; ते सर्व तटाशिवाय व दरवाजे व कुंपणाशिवाय राहतात.
१२
मी त्यांना लुटेन व लुबाडून घेईन आणि माझा हात पुन्हा स्थायिक झालेल्या ओसाडीवर व राष्ट्रांतून एकत्र केलेले लोक, देशाच्या मधोमध राहणारी उत्तम गुरे आणि संपत्ती यावर पडेल.”
१३
शबा, ददानचे लोक आणि तार्शीशचे व्यापारी व त्यांची सर्व गावे तुला म्हणतील, “तू लुटायला आला आहे काय? लूट घेण्यास, सोने व चांदी वाहून नेण्यास, गुरे व संपत्ती घेऊन नेण्यास व पुष्कळ लूट ताब्यात घेण्यासाठी तुझे पुष्कळ लोक तू एकत्र केले काय?” ’
१४
“यास्तव, मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि गोगला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी, जेव्हा माझे इस्राएली लोक सुरक्षिततेत राहात आहेत, त्यांची नोंद तू घेणार नाही काय?
१५
उत्तरेकडील तुझ्या स्थानातून तू येशील, तू आणि तुझ्याबरोबर पुष्कळ राष्ट्रे, त्यातील प्रत्येक घोड्यावर स्वार असलेले, मोठे दळ, मोठे सैन्य असेल.
१६
मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्‍या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options