Skip to content
यहेज्केल ३८:१८-२३

परमेश्वराचा क्रोध व महान न्याय

यहेज्केल ३८:१८-२३
१८
त्या दिवशी असे होईल: जेव्हा गोग इस्राएल देशावर हल्ला करेल, तेव्हा माझा तापलेला क्रोध भडकेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
१९
माझी ईर्षा व पेटलेल्या संतापाने मी जाहीर करतो की, त्यावेळी इस्राएल देशात मोठा भूकंप येईल.
२०
समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, रानातील पशू, भूमीवर सरपटणारा प्रत्येक प्राणी आणि पृथ्वीच्या पाठीवरील सर्व लोक माझ्या समक्षतेत थरथर कापतील. पर्वत कोसळतील, कडे खचतील आणि प्रत्येक भिंत जमिनीवर पडेल.
२१
मी गोगविरुद्ध माझ्या सर्व पर्वतांवर तलवार बोलवेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. प्रत्येकाची तलवार आपआपल्या भावाविरुद्ध चालेल.
२२
मरी व रक्तपाताद्वारे मी त्याच्यावर न्याय आणेन; त्याच्यावर व त्याच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर असलेल्या पुष्कळ राष्ट्रांवर मी मुसळधार पाऊस, गारा व जळते गंधक ओतेन.
२३
अशाप्रकारे मी माझी महानता व पवित्रता दाखवेन, आणि अनेक राष्ट्रांदेखत मी स्वतःस प्रकट करेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options