स्वारीची वेळ व हेतू
८
पुष्कळ दिवस गेल्यानंतर तुला बोलाविण्यात येईल. येत्या काळात जो देश युद्धातून परत आलेला आहे, ज्याचे लोक पुष्कळ राष्ट्रांतून इस्राएलच्या पर्वतांकडे एकत्र केले आहेत. जो पुष्कळ काळ ओसाड पडला होता. त्यांना राष्ट्रांतून बाहेर आणले गेले आणि जे आता सुरक्षिततेत राहतात, तू त्या देशावर आक्रमण करशील.
९
तू आणि तुझे सर्व सैन्य व तुझ्याबरोबर अनेक राष्ट्रे वादळाप्रमाणे पुढे जातील; तुम्ही मेघांप्रमाणे देश झाकून टाकाल.
१०
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तुमच्या मनात विचार येतील आणि तुम्ही वाईट युक्ती योजाल.
११
तू म्हणशील, “तट नसलेल्या गावांवर मी आक्रमण करेन; शांतीच्या व निश्चिंत असलेल्या लोकांवर मी हल्ला करेन; ते सर्व तटाशिवाय व दरवाजे व कुंपणाशिवाय राहतात.
१२
मी त्यांना लुटेन व लुबाडून घेईन आणि माझा हात पुन्हा स्थायिक झालेल्या ओसाडीवर व राष्ट्रांतून एकत्र केलेले लोक, देशाच्या मधोमध राहणारी उत्तम गुरे आणि संपत्ती यावर पडेल.”
१३
शबा, ददानचे लोक आणि तार्शीशचे व्यापारी व त्यांची सर्व गावे तुला म्हणतील, “तू लुटायला आला आहे काय? लूट घेण्यास, सोने व चांदी वाहून नेण्यास, गुरे व संपत्ती घेऊन नेण्यास व पुष्कळ लूट ताब्यात घेण्यासाठी तुझे पुष्कळ लोक तू एकत्र केले काय?” ’
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.