यहेज्केल ३८:१०-१२
१०
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तुमच्या मनात विचार येतील आणि तुम्ही वाईट युक्ती योजाल.
११
तू म्हणशील, “तट नसलेल्या गावांवर मी आक्रमण करेन; शांतीच्या व निश्चिंत असलेल्या लोकांवर मी हल्ला करेन; ते सर्व तटाशिवाय व दरवाजे व कुंपणाशिवाय राहतात.
१२
मी त्यांना लुटेन व लुबाडून घेईन आणि माझा हात पुन्हा स्थायिक झालेल्या ओसाडीवर व राष्ट्रांतून एकत्र केलेले लोक, देशाच्या मधोमध राहणारी उत्तम गुरे आणि संपत्ती यावर पडेल.”
Settings