मुख्य मजकुरावर जा
यहेज्केल ३०:१-९

मिसरविरुद्ध परमेश्वराचा दिवस

यहेज्केल ३०:१-९
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘आक्रोश करून सांग, “त्या दिवसाला हाय हाय!”
कारण दिवस जवळ आहे, याहवेहचा दिवस जवळ आहे; तो आभाळाचा दिवस, राष्ट्रांच्या नाशाचा दिवस असेल.
इजिप्तविरुद्ध एक तलवार येईल आणि कूशवर वेदना येतील. जेव्हा वधलेले इजिप्तमध्ये पडतील, तिची संपत्ती काढून घेतली जाईल आणि तिचे पाये मोडून टाकले जातील.
कूश आणि लिबिया, लूद व संपूर्ण अरब, कूब आणि कराराच्या देशाचे लोक इजिप्तबरोबर तलवारीने पडतील.
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘इजिप्तचे मित्रगण पडतील तिचे अहंकारी बळ सुद्धा पडेल. मिग्दोलपासून असवानपर्यंत सर्व तिच्यामध्ये तलवारीने पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये, ते ओसाड पडतील, आणि त्यांची शहरे उद्ध्वस्त झालेल्या शहरांमध्ये पडतील.
तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे, मी जेव्हा इजिप्तला आग लावेन, तेव्हा तिला मदत करणार्‍यांचाही चुरा होईल.
“ ‘त्या दिवशी त्या कूशी लोकांना घाबरवून त्यांच्या निश्चिंतेतून बाहेर काढावे म्हणून माझ्याकडून जहाजामध्ये संदेष्टे जातील. इजिप्तच्या नाशाच्या दिवशी वेदना त्यांचा ताबा घेईल, कारण तो दिवस खचितच येत आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options