Skip to content
यहेज्केल ३:१८-२१

यहेज्केल ३:१८-२१

१८
जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू त्यांना चेतावणी दिली नाहीस किंवा त्यांनी त्यांचे दुष्टमार्ग सोडून त्यांचा जीव वाचवावा म्हणून तू त्यांना सांगितले नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.
१९
परंतु त्या दुष्ट व्यक्तीने त्याच्या दुष्टाईपासून व त्यांच्या कुमार्गापासून वळावे म्हणून तू त्याला सावध केलेस आणि ते तसे करीत नाहीत, तर ते त्यांच्या पापामुळे मरतील; परंतु तू स्वतः वाचशील.
२०
“त्याच प्रकारे, जेव्हा एखादा न्यायी आपल्या न्यायत्वापासून मागे फिरतो आणि जे वाईट ते करतो आणि मी त्यांच्यापुढे एक अडखळण ठेवेन आणि तो मरण पावेल. कारण तू त्याला चेतावणी दिली नाही, तो त्याच्या पापामुळे मरेल. जी न्यायीपणाची कृत्ये त्या व्यक्तीने केली ती आठवली जाणार नाहीत, आणि त्याच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.
२१
परंतु पाप करू नये म्हणून तू त्या न्यायी व्यक्तीला चेतावणी दिली आणि त्याने पाप केले नाही आणि त्याने ती चेतावणी स्वीकारली म्हणून तो खचितच जगेल आणि तू स्वतःला वाचवशील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options