Skip to content
निर्गम २५:२३-२८

निर्गम २५:२३-२८

२३
“बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनवा; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच असावा.
२४
त्याला शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे आणि त्याभोवती सोन्याचा काठ करावा.
२५
मेजाच्या सभोवती चार बोटे रुंदीएवढी पट्टी बनवून त्यावर सोन्याचा काठ करावा.
२६
मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या कराव्‍यात आणि त्या चार पायांच्या चार कोपर्‍यांवर लावाव्या.
२७
मेज वाहून नेण्याच्या दांड्या धरण्यासाठी कड्या पट्टीच्या जवळ असाव्यात.
२८
दांडे बाभळीच्या लाकडाचे असावेत, त्यांना सोन्याचे आवरण द्यावे आणि मेज वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग करावा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options