मुख्य मजकुरावर जा
एस्तेर ६:१-५

राजा इतिहासवृत्तांत वाचतो

एस्तेर ६:१-५
त्या रात्री राजाला झोप येईना, म्हणून त्याने राज्याच्या इतिहासाचा ग्रंथ मागविला, त्याच्या कारकिर्दीचा इतिहास आणण्यात आला व त्याचे वाचन करण्यात येऊ लागले.
ग्रंथाचे वाचन चालू असताना, राजवाड्याचे दोन खोजे, द्वाररक्षक बिग्थाना व तेरेश यांनी अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा कट मर्दखय याने कसा उघडकीस आणला होता, ही संपूर्ण हकिकत नोंदविण्यात आल्याचे कळले.
तेव्हा राजाने विचारले, “याबद्दल मर्दखयाचा सन्मान करण्यात आला होता का?” “त्याच्यासाठी काही करण्यात आले नाही,” सेवकांनी उत्तर दिले.
राजाने विचारले, “राजदरबारात कोण आहे?” त्याचवेळी हामानाने नुकताच राजदरबाराच्या बाहेरच्या चौकात प्रवेश केला. आपण उभ्या केलेल्या सुळावर मर्दखयाला फाशी देण्याची परवानगी राजापाशी मागण्यासाठी तो आलेला होता.
तेव्हा राजदरबारी उत्तरले, “हामान राजदरबारात उभा आहे.” “त्याला आत आणा,” राजाने फर्माविले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options