Skip to content
एस्तेर ६:६-९

हामान राजाला सल्ला देतो

एस्तेर ६:६-९
मग हामान आत आल्यावर, राजाने त्याला विचारले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास काय करावयाला हवे?” आता हामानाने स्वतःबद्दल विचार केला, “राजाच्या मर्जीत सन्मानास योग्य असणारा माझ्याशिवाय दुसरा कोण असेल?”
म्हणून हामानाने राजाला उत्तर दिले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास,
राजाने स्वतः परिधान केलेला पोशाख व राजाने स्वारी केलेला घोडा मागवावा आणि राजमुकुट त्याच्या मस्तकावर ठेवावा.
आणि राजाच्या अत्यंत थोर सरदाराला तो पोशाख व घोडा द्यावा. आणि राजा ज्याचा सन्मान करू इच्छितो त्याच्या अंगावर ते कपडे चढवावे, आणि त्याच्यापुढे हे जाहीर करीत जावे, ‘राजाला जे प्रसन्न करतात, त्यांचा सन्मान राजा अशा रीतीने करतो!’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options