एस्तेर ५:८-१२
८
महाराजांची मजवर कृपा असेल आणि आपण मजवर प्रसन्न असाल तर, माझी विनंती मान्य करा, आपण उद्या पुन्हा हामानाला बरोबर घेऊन आपल्यासाठी मी तयार करणार असलेल्या मेजवानीला यावे; आणि मग उद्या मी महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर देईन.”
९
मेजवानीवरून घरी परतल्यावर हामान खूपच आनंदात होता. परंतु राजवाड्याच्या दाराजवळ बसलेल्या मर्दखयास बघितले व आपल्यासमोर तो उठून उभा राहिला नाही, घाबरला नाही, हे पाहून हामान संतापाने भरून गेला.
१०
तरी, हामानाने स्वतःला आवरले व तो घरी गेला. त्याने आपले मित्र व आपली पत्नी जेरेश यांना एकत्र बोलाविले.
११
त्यांच्यापुढे आपल्या संपत्तीची, आपल्या अनेक मुलांची, राजाने दिलेल्या बहुमानाची आणि संपूर्ण राज्यात इतर प्रतिष्ठित व अधिकाऱ्यांपेक्षा आपण सर्वात उच्च कसे झालो या सर्वांची हामान बढाई मारू लागला.
१२
मग हामान पुढे म्हणाला, “आणि एवढेच नव्हे, एस्तेर राणीने आज राजाबरोबर केवळ मलाच तिने तयार केलेल्या मेजवानीला बोलाविले होते आणि उद्याही पुन्हा आम्हाला तिच्या मेजवानीचे आमंत्रण आहे!”
Settings