Skip to content
इफिसकरांस ५:१५-२१

आत्म्यात शहाणपणाने जगणे

इफिसकरांस ५:१५-२१
१५
म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या.
१६
दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.
१७
मुर्खासारखे वागू नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या.
१८
मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा.
१९
आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते गाऊन एकमेकांशी बोला. भजने गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभूची स्तुती करा.
२०
आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना.
२१
ख्रिस्ताबद्दल असलेल्या आदरामुळे एकमेकांच्या अधीन राहा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options