मुख्य मजकुरावर जा
अनुवाद ३२:२६-३३

देवाची दया व शत्रूचा मूर्खपणा

अनुवाद ३२:२६-३३
२६
मी असे म्हटले असते, मी त्यांना दूरच्या देशात पांगविणार आणि त्यांची आठवणसुद्धा मानवी स्मरणातून पुसली जाईल,
२७
पण मला शत्रूच्या फुशारक्यांची धास्ती वाटली, ते कदाचित गैरसमज करतील, आणि म्हणतील, ‘आम्ही आमच्या बाहुबलानेच विजय मिळविला आहे; याहवेहने यातील काहीही केले नाही.’ ”
२८
ते एक असमंजस राष्ट्र आहे, त्यांच्यात काही विवेक नाही.
२९
हे लोक सुज्ञ असते आणि जर त्यांना हे कळले असते तर किती बरे झाले असते, आणि त्यांचा अंत कसा होणार हे त्यांना समजले असते!
३०
हे कसे शक्य आहे, केवळ एक मनुष्य हजार लोकांचा, किंवा दोन लोक दहा हजार लोकांचा पाठलाग करू शकतात, जर इस्राएलांच्या खडकाने त्यांना विकून टाकले नसते, जर याहवेहने त्यांना टाकले नसते, तरच असे होऊ शकले असते?
३१
कारण त्यांचा खडक आमच्या खडकासारखा नाही, आमचे शत्रू देखील हे मान्य करतात.
३२
त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेमधून येते, आणि गमोराच्या मळ्यातून येते. त्यांचे द्राक्ष विषाने भरलेले आहेत, आणि द्राक्षाचे घड कडू चवीचे आहेत.
३३
त्यांचे द्राक्षारस सर्पाचे विष, ते नागांचे घातक विष आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options