अर्थ: मेद-पारस, ग्रीस आणि लहान शिंग
२०
जो मेंढ्याचा स्वामी आणि तू पाहिलेल्या मेंढ्याची दोन शिंगे म्हणजे मेदिया व पर्शियाचे राजे आहेत.
२१
तो केसाळ बोकड म्हणजे ग्रीस राष्ट्र होय आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध मोठे शिंग म्हणजे त्या देशाचा पहिला राजा होय.
२२
तुटलेल्या शिंगाच्या जागी बाहेर आलेली चार शिंगे एकाच देशातून उदयास येणार्या चार राज्यांचे प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांची शक्ती पूर्वीच्या राज्यासारखी नसेल.
२३
“त्याच्या कारकिर्दी नंतरच्या काळात, जेव्हा बंडखोर पूर्ण दुष्टाईत येतील, तेव्हा एक भयानक रूपाचा राजा उदयास येईल, जो कूटप्रश्न समजणारा तज्ञ असेल.
२४
त्याचे सामर्थ्य मोठे असेल, पण ते त्याचे स्वतःचे नसेल. तो भयंकर नाश करणार आणि जे काही तो करेल, त्यामध्ये त्याला यश मिळेल. जे बलवान आणि पवित्र आहेत अशा लोकांचा तो नाश करेल.
२५
तो कपटाचा उपयोग समृद्ध होण्यास करेल आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजेल. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हा तो अनेकांचा नाश करेल आणि राजपुत्रांच्या राजपुत्राच्या विरोधात उभा राहील. तरीही तो नष्ट होईल, परंतु मनुष्याच्या सामर्थ्याने नाही.
२६
“संध्याकाळ आणि सकाळचा दृष्टान्त जो तुला देण्यात आला आहे तो खरा आहे, पण हा दृष्टान्त तू गुप्त ठेव. कारण तो येणार्या भविष्यकाळाशी संबंधित आहे.”
२७
मग मी दानीएल, बेशुद्ध झालो आणि पुढेही कित्येक दिवस आजारी होतो. पुढे मी उभा झालो आणि राजाचा कारभार पाहू लागलो. परंतु या दृष्टान्तामुळे मी विस्मित झालो, माझे अंतःकरण फार अस्वस्थ झाले; ते समजण्यापलीकडे होते.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.