मुख्य मजकुरावर जा
दानीएल ३:१३-१८

अग्नीची भट्टी

दानीएल ३:१३-१८
१३
नबुखद्नेस्सर क्रोधाने संतप्त झाला व शद्रख, मेशख व अबेदनगो यांना हजर करावे असा त्याने हुकूम दिला. तेव्हा या लोकांना राजासमोर आणण्यात आले,
१४
नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “शद्रख, मेशख आणि अबेदनगो, तुम्ही माझ्या दैवतांची सेवा व मी स्थापन केलेल्या सुवर्ण पुतळ्याची उपासना करीत नाही, हे खरे आहे काय?
१५
मग आता जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच मी तयार केलेल्या पुतळ्याला तुम्ही नमन केले आणि उपासना केली तर उत्तम. परंतु जर तुम्ही उपासना नाही केली तर त्याच घटकेस तुम्हाला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणता देव तुम्हाला सोडवितो ते पाहूया?”
१६
शद्रख, मेशख व अबेदनगो यांनी त्याला उत्तर दिले, “नबुखद्नेस्सर महाराज, याबद्दल तुमच्यासमोर आमचा बचाव करण्याची आम्हाला गरज नाही.
१७
जर आम्हाला धगधगत्या भट्टीत टाकले, तर आमचे परमेश्वर ज्यांची आम्ही सेवा करतो ते आम्हाला तिच्यातून सोडविण्यास समर्थ आहे आणि महाराज, तेच आम्हाला आपल्या हातून सोडवतील.
१८
परंतु असे जरी झाले नाही, तरीही महाराज तुम्हाला हे कळावे की आम्ही तुझ्या दैवतांची सेवा करणार नाही किंवा आपण स्थापन केलेल्या या सुवर्ण पुतळ्याला नमनही करणार नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options