Skip to content
दानीएल ३:८-१२

तीन इब्री पुरुषांवर आरोप

दानीएल ३:८-१२
यावेळी काही ज्योतिषी राजाकडे गेले व यहूदींवर आरोप लावला.
ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “महाराज, चिरायू असा!
१०
महाराज तुम्ही आदेश दिला आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच सर्वांनी सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी,
११
आणि जो कोणी असे करणार नाही त्याला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात यावे.
१२
परंतु काही यहूदी आहेत ज्यांना तुम्ही बाबेलच्या कारभारावर नेमलेले आहे—शद्रख, मेशख, व अबेदनगो—जे तुमच्या आज्ञेकडे लक्ष्य देत नाही. महाराज, यांनी आपली आज्ञा मानली नाही. ते तुमच्या दैवतांची सेवा करीत नाही किंवा आपण उभारलेल्या सुवर्ण पुतळ्याला नमनही करीत नाही.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options