दानीएल ३:१-७
१
नबुखद्नेस्सर राजाने एक सुवर्ण पुतळा घडविला. त्याची उंची साठ हात आणि रुंदी सहा हात होती, आणि बाबेल प्रांतातील दूरा नावाच्या मैदानात हा पुतळा स्थापित केला.
२
मग नबुखद्नेस्सरने आपल्या साम्राज्यातील राजपुत्र, सर्व राज्यपाल, सेनानायक, न्यायाधीश, कोषाधिकारी, मंत्री, सर्व प्रांताचे अधिकारी या सर्वांना त्याने स्थापिलेल्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी बोलाविले.
३
राजपुत्र, राज्यपाल, सेनानायक, न्यायाधीश, कोषाधिकारी, मंत्री, सर्व प्रांताचे अधिकारी नबुखद्नेस्सर राजाने स्थापिलेल्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी एकत्र झाले आणि त्या पुतळ्याच्या पुढे उभे राहिले.
४
तेव्हा ललकारी देणाऱ्याने मोठ्याने घोषणा केली, “अहो सर्व राष्ट्रातील आणि विविध भाषा बोलणारे लोकहो, तुम्हाला ही आज्ञा देण्यात येते:
५
शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच, तुम्हाला नबुखद्नेस्सर महाराजांनी उभारलेल्या या सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी लागेल.
६
जो कोणी दंडवत घालून उपासना करणार नाही, त्याला ताबडतोब अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल.”
७
म्हणून जेव्हा त्यांनी कर्णे, बासरी, सतार, तंतुवाद्य, वीणा आणि सर्वप्रकारचे संगीत ऐकले, तेव्हा सर्व वंश आणि भाषांचे लोक पालथे पडले आणि त्यांनी राजा नबुखद्नेस्सरने प्रतिष्ठापन केलेल्या सोन्याच्या मूर्तीची आराधना केली.
Settings