Skip to content
दानीएल २:२४-३०

दानीएल २:२४-३०

२४
बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करण्याचे काम अर्योकवर सोपविले होते. दानीएल त्याला जाऊन भेटला व म्हणाला, “बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करू नका. मला राजाकडे घेऊन चला आणि मी राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगेन.”
२५
अर्योकने लगबगीने दानीएलला राजाकडे घेऊन गेला आणि म्हणाला, “यहूदी कैद्यांपैकी मला एक पुरुष सापडला आहे जो राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकेल.”
२६
राजाने दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जाते) विचारले, “मी जे स्वप्न पाहिले ते आणि त्याचा अर्थ तू सांगण्यास सक्षम आहेस काय?”
२७
दानीएलने उत्तर दिले, “महाराजांनी ज्या रहस्याबद्दल विचारले, त्याबद्दल कोणीही ज्ञानी मनुष्य, ज्योतिषी, जादूगार किंवा दैवप्रश्न करणारे राजाला या गोष्टी सांगू शकणार नाही,
२८
परंतु स्वर्गामधील परमेश्वर गूढ रहस्ये प्रकट करतात. येणार्‍या दिवसात काय घडणार ते त्यांनीच नबुखद्नेस्सर राजाला दाखविले आहे. तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टान्त जे तुमच्या मनातून पार झाले ते हे आहेत:
२९
“महाराज जेव्हा तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता, तुमचे मन होणार्‍या भावी घटनेकडे लागले आणि रहस्ये प्रकट करणार्‍यांनी तुम्हाला भविष्यात काय होणार आहे हे दाखविले आहे.
३०
माझ्यासाठी, हे रहस्य मला उघड केले गेले कारण माझ्याकडे इतर जिवंत माणसापेक्षा जास्त बुद्धी आहे म्हणून नाही, परंतु महाराजांना रहस्याचा अर्थ कळावा आणि तुमच्या मनात काय चालले आहे ते समजावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options