दानीएल २:१४-१९
१४
जेव्हा अर्योक हा राजाच्या संरक्षकांचा प्रमुख बाबेलमधील ज्ञानी पुरुषांचा वध करण्यासाठी गेला तेव्हा दानीएल शहाणपणाने व सुज्ञपणे त्याच्याशी बोलला.
१५
त्याने राजाच्या अधिकार्याला विचारले, “राजाने असा कठोर निर्णय का घेतला?” अर्योकने मग दानीएलला सर्व हकिकत सांगितली.
१६
ते ऐकून दानीएलने राजाची भेट घेतली व त्याला म्हणाला मला थोडा वेळ देण्याची मागणी केली, म्हणजे तो स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकेल.
१७
मग दानीएल आपल्या घरी परत आला व सर्व घटना त्याने आपल्या सोबत्यांना हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांना सांगितली.
१८
दानीएलाने त्यांना या रहस्याबद्दल स्वर्गाच्या परमेश्वराची दया मागण्याची विनंती केली, जेणेकरून बाबेलमधील इतर ज्ञानी माणसांसह त्याचा आणि त्याच्या मित्रांचा नाश होऊ नये.
१९
त्या रात्री याहवेहने दानीएलला दृष्टान्तात ते रहस्य प्रकट केले. तेव्हा दानीएलने स्वर्गाच्या परमेश्वराला धन्यवाद दिला.
Settings