मुख्य मजकुरावर जा
आमोस ९:७-१०

इस्राएलाची ओळख आणि अंतिम जतन

आमोस ९:७-१०
“तुम्ही इस्राएली लोक माझ्यासाठी कूशी लोकांसारखेच नाहीत काय?” असे याहवेह घोषित करतात. “मी इस्राएल लोकांना इजिप्त देशातून, पलिष्ट्यांना कफतोरातून आणि अरामी लोकांना कीर देशातून बाहेर काढले नाही काय?
“खचितच, सार्वभौम याहवेहची दृष्टी या पापी राज्यावर आहे. आणि मी त्यांचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून नाश करेन; तरीसुद्धा मी याकोबाच्या संतानांचा कायमचा नाश करणार नाही,” असे याहवेह घोषित करतात.
“तर पाहा, मी आज्ञा करेन आणि जसे चाळणीने धान्य चाळावे त्याप्रमाणे इस्राएलला इतर राष्ट्रांनी चाळावे, पण त्याचा एक खडाही भूमीवर पडणार नाही.
१०
माझ्या लोकांतील जे सर्व पापी म्हणतात, ‘संकटे आमच्यावर येणार नाही वा आम्हाला गाठणार नाहीत, ते तलवारीने मरतील.’
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options