मुख्य मजकुरावर जा
प्रेषित २१:३७-४०

पौल सेनापती व जमावाला संबोधतो

प्रेषित २१:३७-४०
३७
पौलाला सैनिक आता बराकीत नेणार, एवढ्यात तो सेनापतीला म्हणाला, “मी आपल्याबरोबर काही बोलू शकतो काय?” त्याने त्याला विचारले. “तुला ग्रीक भाषा येते काय?
३८
ज्या इजिप्तच्या मनुष्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार दहशतवाद्यांस रानात नेले होते, तो तूच आहेस नाही का?”
३९
पौलाने उत्तर दिले, “मी यहूदी आहे व किलिकियातील तार्सस शहराचा नागरिक असून, माझे शहर सर्वसामान्य नाही. कृपा करून या लोकांबरोबर मला बोलू द्यावे.”
४०
सेनापतीची परवानगी मिळाल्यावर, पौल पायर्‍यांवर उभा राहिला आणि लोकांनी शांत राहवे, असे त्याने हाताने खुणावले. ते सर्व शांत झाल्यावर, तो इब्री भाषेत म्हणाला:
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options