प्रेषित २१:२७-३६
२७
ते सात दिवस अंदाजे संपत आलेले असताना, आशियातून आलेल्या काही यहूद्यांनी पौलाला मंदिरात पाहिले. तेव्हा त्यांनी सर्व जमावाला चिथविले व त्याला पकडले,
२८
ते मोठ्याने ओरडत म्हणाले, “अहो इस्राएल लोकहो, आमची मदत करा! हा मनुष्य प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या स्थळाबद्दल शिकवण देतो आणि याशिवाय या मनुष्याने गैरयहूदी लोकांना येथे आणून हे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे.”
२९
या आधी त्यांनी पौलाला इफिस येथील त्रोफिमबरोबर शहरात पाहिले होते आणि पौलाने त्याला मंदिरात आणले असावे असा त्यांचा समज झाला होता.
३०
तेव्हा सर्व शहर खळबळून गेले आणि सर्व बाजूंनी लोक धावत आले. पौलाला जबरदस्तीने पकडून मंदिरातून ओढून काढण्यात आले आणि तत्काळ दरवाजे बंद करण्यात आले.
३१
ते त्याला ठार करण्याच्या विचारात होते, एवढ्यात रोमी लष्करी ठाण्याच्या सेनापतीकडे बातमी गेली की सर्व यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे.
३२
तेव्हा तो त्वरित आपल्या सैनिकांना व अधिकार्यांना घेऊन धावत समुदायाकडे गेला. मारणार्यांनी सेनापतीला व फौजेला येताना पाहिल्याबरोबर पौलाला फटके मारण्याचे थांबविले.
३३
सेनापतीने येऊन त्याला अटक केली आणि दोन साखळ्यांनी त्याला बांधण्यात यावे अशी आज्ञा केली. नंतर त्याने तो कोण होता आणि त्याने काय केले होते याची चौकशी केली.
३४
तेव्हा समुदायातील काही लोक एक आणि इतर दुसरे काहीतरी म्हणत होते. या गलबल्यामुळे सेनापतीला खरे ते काही कळेना, म्हणून त्याने पौलाला बराकीत नेण्याचा हुकूम दिला.
३५
पौल पायर्यांपर्यंत पोहोचला, त्यावेळी लोकांची हिंसा एवढी वाढली की होती की सैनिकांना त्याला उचलून न्यावे लागले.
३६
त्याच्यामागे चालत येणारा लोकसमुदाय सारखा ओरडत होता, “याची विल्हेवाट लावा!”
Settings