Skip to content
2 शमुवेल १५:२४-३०

2 शमुवेल १५:२४-३०

२४
सादोक सुद्धा तिथे होता आणि सर्व लेवी लोक जे त्याच्याबरोबर होते ते परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेत होते. त्यांनी परमेश्वराचा कोश खाली ठेवला आणि सर्व लोकांनी शहर सोडण्याचे पूर्ण होईपर्यंत अबीयाथारने यज्ञार्पणे केली.
२५
नंतर दावीद राजाने सादोकाला म्हटले, “परमेश्वराचा कोश परत शहरात घेऊन जा. जर याहवेहच्या दृष्टीत मी कृपा पावलो असलो तर याहवेह मला परत आणतील यासाठी की मी कोश व याहवेहचे निवासस्थान पुन्हा पाहू शकेल.
२६
परंतु जर याहवेहने म्हटले, ‘मी तुझ्यावर प्रसन्न नाही,’ तर मी तयार आहे; त्यांना जे बरे वाटते तसे याहवेह माझे करो.”
२७
राजाने सादोक याजकाला आणखी पुढे म्हटले, “तुला कळते की नाही? माझ्या आशीर्वादासह नगरात परत जा. तुझा पुत्र अहीमाज आणि अबीयाथारचा पुत्र योनाथान यांना सोबत घेऊन जा. तू आणि अबीयाथार तुमच्या दोन्ही पुत्रांसह परत या.
२८
मला कळविण्यासाठी तुझा संदेश येईपर्यंत मी रानाकडील मैदानात वाट पाहीन.”
२९
त्याप्रमाणे सादोक व अबीयाथार यांनी परमेश्वराचा कोश परत यरुशलेमास नेला व ते तिथेच राहिले.
३०
परंतु दावीद जैतुनाच्या डोंगराकडे रडत रडतच चालत चढत होता; त्याने आपले मस्तक झाकून घेतले होते व अनवाणी चालत होता. त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांनीसुद्धा आपले मस्तक झाकून ते रडत रडत वर चढले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options