Skip to content
2 राजे २२:३-७

मंदिराची दुरुस्ती

2 राजे २२:३-७
त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीयाह राजाने मशुल्लामचा पुत्र, अजल्याहचा पुत्र व त्याचा चिटणीस शाफानला याहवेहच्या मंदिरात पाठवले. त्याने म्हटले:
“मुख्य याजक हिल्कियाहकडे जा व याहवेहच्या मंदिरात आलेले पैसे, जे द्वारपालांनी गोळा केले होते ते याजकांनी तयार ठेवावे.
त्यांनी ते मंदिरातील कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या पुरुषांकडे सोपवावे. आणि या लोकांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करणार्‍या कामगारांना द्यावे—
सुतार, बांधकाम करणारे, गवंडी यांना द्यावा आणि मंदिराच्या डागडुजीसाठी लागणारी लाकडे व घडीव दगड विकत घेण्यात यावे.
परंतु ज्यांच्याजवळ पैसा देण्यात आलेला आहे त्यांचा हिशोब ठेवण्याची गरज नव्हती, कारण ते विश्वासूपणे कार्य करीत आहेत.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options