2 राजे १५:१-७
१
इस्राएलाचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा अमस्याहाचा पुत्र अजर्याह राज्य करू लागला.
२
तो वयाच्या सोळाव्या वर्षी राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यकोल्याह. ती यरुशलेम येथील होती.
३
त्याने त्याचा पिता अमस्याहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
४
तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.
५
याहवेहने राजाला पीडले आणि तो मरेपर्यंत त्याला कुष्ठरोग होता. तो वेगळ्या घरात राहिला. राजाचा पुत्र योथामाकडे राजवाड्याचा कारभार होता आणि तो देशाच्या जनतेवर शासन करीत असे.
६
अजर्याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे काही केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले नाही काय?
७
अजर्याह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदनगरीत पुरण्यात आले. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र योथाम राजा झाला.
Settings