Skip to content
2 करिंथकरांस २:५-११

2 करिंथकरांस २:५-११

जर कोणी दुःख दिले, तर त्याने केवळ मलाच अधिक दुःख दिले असे नाही तर काही अंशी तुम्हा सर्वांना दुःख दिले आहे—त्यापेक्षा अधिक कडक शब्दात बोलू इच्छित नाही.
तुम्ही सार्‍यांनी बहुमताने त्याला शिक्षा दिली ती पुरेशी आहे.
याउलट, त्याला आता क्षमा करण्याची व त्याचे सांत्वन करण्याची वेळ आहे, नाही तर तो अतिशय दुःखामध्ये बुडून जाण्याची शक्यता आहे.
आता मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याच्यावर प्रीती करता याची त्याला खात्री द्या.
हे पत्र लिहिण्याचे दुसरे कारण आहे की तुम्ही परीक्षेत स्थिर आहात व प्रत्येक गोष्टीत आज्ञा पाळता हे अजमावून पाहावे.
१०
तुम्ही एखाद्याला क्षमा करता, त्याला मीही क्षमा करतो. ज्याची मी क्षमा केली आहे आणि जर क्षमा करण्याचे बाकी आहे तर ती ख्रिस्ताच्या समक्ष तुमच्या हितासाठी केली आहे.
११
यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये; कारण त्याचे डाव आपल्याला कळत नाहीत असे नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options