2 इतिहास ३०:६-१२
६
राजाज्ञेनुसार, राजा आणि त्याच्या अधिकार्यांकडून पत्रे घेऊन संदेशवाहक संपूर्ण इस्राएल आणि यहूदीयामध्ये गेले, ज्यात लिहिले होते: “अहो, इस्राएलचे लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे परत या, म्हणजे, अश्शूरी राजांच्या हातातून जे निसटले आहेत त्यांच्याकडे ते परत येतील.
७
तुमच्या पालकांसारखे होऊ नका आणि तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली लोकांसारखे होऊ नका, जे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहबरोबर अविश्वासू राहिले, त्यामुळे त्यांनी त्यांना उपहासाचे पात्र केले, जसे ते तुम्हाला दिसतात.
८
तुम्ही तुमच्या पूर्वजांसारखे ताठ मानेचे होऊ नका. याहवेहना शरण जा. त्यांनी सनातनकाळासाठी पवित्र केलेल्या त्यांच्या पवित्रस्थानात या. तुमचे परमेश्वर याहवेहची सेवा करा, म्हणजे त्यांचा भयंकर क्रोध तुमच्यापासून दूर होईल.
९
जर तुम्ही याहवेहकडे परत याल, तर तुमच्याबरोबर असणारे इस्राएली लोक आणि तुमच्या मुलाबाळांवर त्यांना कैद करणाऱ्यांकडून दया करण्यात येईल आणि ते या देशात परत येतील, कारण तुमचे परमेश्वर याहवेह हे कृपाळू आणि दयाळू आहेत. जर तुम्ही त्यांच्याकडे परत आलात तर ते तुमच्यापासून मुख फिरविणार नाहीत.”
१०
संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली.
११
तरीसुद्धा आशेर, मनश्शेह आणि जबुलून येथील काही लोकांनी स्वतःला नम्र केले आणि ते यरुशलेमला गेले.
१२
याहवेहच्या वचनास अनुसरून राजा आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी जे आदेश दिले होते, ते एकमताने पूर्ण करण्यासाठी यहूदीयामध्येही परमेश्वराचा हात लोकांवर होता.
Settings