Skip to content
2 इतिहास ३:८-१४

परमपवित्र स्थान व करूब

2 इतिहास ३:८-१४
त्याने परमपवित्रस्थान बांधले, त्याची लांबी मंदिराच्या रुंदीएवढी, वीस हात लांब आणि वीस हात रुंद होती. त्याच्या आतील भाग सहाशे तालांत शुद्ध सोन्याने मढविला.
त्यात पन्नास शेकेल वजनाचे सोन्याचे खिळे वापरण्यात आले होते. वरचा भाग सुद्धा सोन्याने मढविला होता.
१०
मग मंदिराच्या परमपवित्रस्थानात शलोमोनाने दोन कोरलेले करूब बसविले व त्यांनाही सोन्याने मढविले.
११
करुबांच्या पंखांची एकूण लांबी वीस हात होती. पहिल्या करुबाचा एक पंख पाच हात लांब होता आणि तो मंदिराच्या भिंतीला लागून होता, तर त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात लांब असून दुसऱ्या करुबाच्या पंखाला लागून होता.
१२
त्याचप्रमाणे दुसऱ्या करुबांचा एक पंख पाच हात लांब आणि मंदिराच्या दुसऱ्या भिंतीला लागून होता आणि त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात लांब आणि पहिल्या करुबाच्या पंखाला लागून होता.
१३
या करुबांचे पंख वीस हात पसरलेले होते. मुख्य दिवानखाण्याकडे तोंड करून ते त्यांच्या पायांवर उभे होते.
१४
त्याने करुबांच्या आकाराची कशिदा केलेले निळ्या, जांभळ्या व किरमिजी धाग्यांचे आणि तागाच्या कापडाचे पडदे तयार केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options