मुख्य मजकुरावर जा
2 इतिहास २९:३१-३६

लोक स्वेच्छेची अर्पणे आणतात

2 इतिहास २९:३१-३६
३१
तेव्हा हिज्कीयाह म्हणाला, “तुम्ही आता स्वतःला याहवेहना समर्पित केले आहे. या आणि याहवेहच्या मंदिरात बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणा.” म्हणून जमलेल्या लोकांनी बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणली आणि ज्या सर्वांची अंतःकरणापासून इच्छा होती त्यांनी होमार्पणे आणली.
३२
तिथे जमलेल्या लोकांनी आणलेल्या होमार्पणांची संख्या सत्तर गोऱ्हे, शंभर मेंढे आणि दोनशे नरकोकरे होती; हे सर्व याहवेहसमोर होमार्पणासाठी आणले होते.
३३
बलिदाने म्हणून शुद्ध केलेल्या प्राण्यांमध्ये सहाशे गोऱ्हे, आणि तीन हजार मेंढ्या आणि बोकडे होते.
३४
तरीसुद्धा सर्व होमार्पणाची कातडी काढण्यासाठी याजक फारच कमी होते. म्हणून त्यांचे नातेवाईक लेवी लोकांनी त्यांना दिलेले काम पूर्ण होईपर्यंत आणि इतर याजकांचे शुद्धीकरण होईपर्यंत मदत केली, कारण लेवी लोक स्वतःचे शुद्धीकरण करण्यामध्ये याजकांपेक्षा अधिक प्रामाणिक होते.
३५
शांत्यर्पणाची चरबी आणि पेयार्पणे यांच्याबरोबरच होमार्पणे विपुल प्रमाणात होती. अशा रीतीने याहवेहच्या मंदिरातील सेवा पुन्हा प्रस्थापित झाली.
३६
परमेश्वराने त्यांच्या लोकांसाठी हे त्वरित सिद्धीस नेले होते, म्हणून हिज्कीयाह आणि सर्व लोक आनंदित झाले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options